Ad will apear here
Next
‘पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील’
जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार

सांगली : ‘सैन्याला केवळ विजयच ठाऊक असतो. पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील. शुक्रवारी दिवसभरात पाच हजार लोकांना अवघड ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले आहे,’ अशी माहिती जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांनी दिली. 

जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार म्हणाले, ‘एवढी मोठी आपत्ती येईल याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये स्थिती गंभीर झाल्याने पूरात अडकलेल्या लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिल्ली येथे उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन अत्यंत गतीने मदतकार्यासाठी सुत्रे हलवण्यात आली. सांगली येथील परिस्थिती जास्त गंभीर असल्याने अन्य ठिकाणी न जाता येथे रातोरात दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आली. त्याव्दारे हरिपूर, सांगलीवाडी परिसरातील पुरात अडकलेल्यांना मदत साहित्य पोहोचविण्यात आले आहे. गाव भागात बोटीव्दारे मदत पोहोचविण्यात येत आहे,’ असेही त्यांनी सांगितले. 

‘संकटाच्या वेळेत एकमेकांना धीर देऊन मदत करण्याची गरज आहे. लवकरच सदर्न कमांडचे कमांडर पाहणी करण्यासाठी येणार आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWECD
Similar Posts
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे
कोल्हापुरात पूरग्रस्त मदत नियंत्रण कक्ष स्थापन कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन पुणे : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा येथे करावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले.
पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी ससूनचे ४२ डॉक्टरांचे पथक रवाना पुणे : कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधे व उपचार साहित्य घेऊन बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील ४२ डॉक्टरांचे पथक रवाना झाले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language